Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»अखेर सुनीता विल्यम्स धरतीवर ! (व्हिडीओ)
    राष्ट्रीय

    अखेर सुनीता विल्यम्स धरतीवर ! (व्हिडीओ)

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 19, 2025Updated:March 19, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    भारतासाठी आनंदाची बातमी आहे.  भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतल्या आहेत. 19 मार्चला पहाटे त्यांचे यान पृथ्वीवर पोहोचले. त्यांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी होत्या; त्यावर मात करत ते सुखरूप परत आले.

    सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी 5 जून 2024 रोजी बोईंगच्या स्टारलायनर अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) गेले केले. ही मोहीम केवळ 8 दिवसांची अपेक्षित होती. मात्र प्रक्षेपणानंतर अंतराळयानाच्या सर्व्हिस मॉड्यूलच्या थ्रस्टरमध्ये हीलियम गळती आणि इतर तांत्रिक अडचणी आल्या ज्यामुळे त्यांचे परतीचे वेळापत्रक लांबले. हा प्रवास 8 दिवसापासून 9 महिन्यापर्यंत पोहोचला. या दरम्यान त्यांनी अवकाशात अनेक संशोधन, प्रयोग केले.

     

    https://www.instagram.com/reel/DHYMCFJgtXX/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA=

    या अडचणींमुळे नासाने स्पेसएक्सच्या ड्रॅगन अंतराळयानाद्वारे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्याचा निर्णय घेतला. स्पेसएक्सच्या क्रू-9 मोहिमेतील ड्रॅगन अंतराळयानाने 9 ऑगस्ट 2024 रोजी ISS वर यशस्वीपणे डॉक केले ज्याद्वारे त्यांच्या परतीची योजना निश्चित करण्यात आली.

    तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकात अडकून राहिल्यानंतर सुखरूप परतलेल्या अंतराळवीरांच्या हिंमतीची दाद द्यावी लागेल. सुनीता विल्यम्स यांच्या पृथ्वीवर परतीने त्यांच्या या यशस्वी मोहिमेबद्दल जगभर आनंद व्यक्त केला जात आहे. या अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्यासाठी नासा आणि इलॉन मस्कने प्रयत्न करून स्पेस एक्स ड्रॅगन कॅप्सुल अवकाश स्थानकावर पाठवले आणि त्यांना सुखरूप परत आणले.

    Sunita Williams Return
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका

    August 10, 2026

    ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात

    August 10, 2026

    संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif