Monday, August 15, 2022

प्रवाशांना दिलासा ! मुंबई, नागपूर, मालदा टाउन दरम्यान ३६ साप्ताहिक उन्हाळी विशेष ट्रेन धावणार

- Advertisement -

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूर / मालदा टाउन दरम्यान ३६ साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालवणार आहे.

- Advertisement -

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर साप्ताहिक १८ फेऱ्या

01033 साप्ताहिक अतिजलद विशेष दि. ९.४.२०२२ ते ४.६.२०२२ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर शनिवारी ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३२ वाजता नागपूर येथे पोहोचेल.

01034 साप्ताहिक अतिजलद विशेष दि. १०.४.२०२२ ते ५.६.२०२२ पर्यंत दर रविवारी १३.३० वाजता नागपूर येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल.

थांबे : दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा

संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मालदा टाउन साप्ताहिक – १८ फेऱ्या

01031 साप्ताहिक अतिजलद विशेष दि. ११.४.२०२२ ते ६.६.२०२२ पर्यंत दर सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११.०५ वाजता सुटेल आणि मालदा टाउन येथे तिसऱ्या दिवशी ००.४५ वाजता पोहोचेल.

01032 साप्ताहिक विशेष दि. १३.४.२०२२ ते ८.६.२०२२ पर्यंत दर बुधवारी मालदा टाउन येथून १२.२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०३.५० वाजता पोहोचेल.

थांबे : दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, मिर्झापूर, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पटना, बख्तियारपूर, किउल, अभयपूर, जमालपूर, सुलतानगंज, भागलपूर, कहलगाव, साहिबगंज, बड़हरवा आणि न्यू फरक्का.

संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन आहे.

आरक्षण: विशेष ट्रेन क्रमांक 01033/01034 आणि 01031 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ८.४.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या