Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»सुकळी शिवारात मधमाशांचा हल्ला
    अपघात

    सुकळी शिवारात मधमाशांचा हल्ला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 10, 2025No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सुकळी शिवारात मधमाशांचा हल्ला

    एकाचा मृत्यू, एक जखमी; परिसरात हळहळ

    मुक्ताईनगर प्रतिनिधी तालुक्यातील सुकळी शिवारात फिरायला गेलेल्या तरुणांच्या गटावर अचानक मधमाशांनी हल्ला चढवल्याने एकाचा मृत्यू तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (८ डिसेंबर) दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

    माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी गावातील सहा ते सात मित्रांचा गट शिवारात गेला होता. शिवारात थोड्या अंतरावर गेले असता अचानक मधमाशांचा प्रचंड कळप त्यांच्या दिशेने झेपावला. या हल्ल्यात रवींद्र राठोड (वय २९) आणि योगेश पाटील (वय ४०) हे दोघे गंभीर जखमी झाले.

    तत्काळ त्यांना मुक्ताईनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मधमाशांच्या दंशामुळे प्रकृती गंभीर झालेल्या रवींद्र राठोड यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर दुसऱ्या जखमी योगेश पाटील यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.अकस्मात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सुकळी परिसरात शोककळा पसरली आहे.

    Muktainagar Accident
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif