‘मला खूप मोठे व्हायचंय, पण…’ असं म्हणत तरुणीची आत्महत्या…

0

 

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क;

औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. एका विद्यार्थिनीनं आपल्या खोलीत आत्महत्या केलीय. औरंगाबाद शहरामधील (Aurangabad) देवगिरी महाविद्यालयाच्या (Deogiri College Aurangabad) मुलींच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनीनं आपल्या खोलीत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती सर्जेराव कोल्हे ( 20 वर्षीय) असं या तरुणीचं नाव आहे. आरती ही जालना जिल्ह्यातील घनसांवगी तालुक्यातील गुरुपिंप्री गावात राहणारी होती. शेतकरी कुटुंबातील आरती ही पुढील शिक्षणासाठी औरंगाबादला आली होती. देवगिरी महाविद्यालयामध्ये बीकॉम प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता. गुरुवारी कॉलेज पूर्ण केलं, दुसऱ्या दिवशी तिच्या मैत्रिणी दुपारी क्लासला निघाल्या होत्या. त्यांनी तिला आवाज दिला पण आरतीने पुढे जाण्यास सांगितले. पण संध्याकाळ झाली तरी ती क्लासला गेलीच नव्हती. मैत्रिणींनी जेव्हा वसतीगृहाच्या खोलीवर येऊन पाहणी केली तेव्हा ती दार उघडत नव्हती. त्यामुळे मैत्रिणींनी त्याची माहिती तातडीने वसतीगृहातील कर्मचाऱ्यांना दिली. कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता आरतीने शालीने गळफास घेतल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरतीला फासावरून खाली उतरवले आणि तातडीने शासकीय रुग्णालय घाटीमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पोलिसांनी रुमची पाहणी केली असता एका रजिस्टरमध्ये आरतीने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. ‘मला खूप मोठे व्हायचंय, पण मला वाटत नाही पुढची 3 वर्षे माझ्याकडून पूर्ण होतील. जीवन हे सुंदर आहे, ते जगले पाहिजे. पण मला आता कंटाळा आला जगण्याचा. सर्व मैत्रिणींनी चांगलं राहावं, मला आता सगळं जड जातंय, अलविदा, असं म्हणत आरतीने आपली जीवनयात्रा संपवली. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे. या घटनेमुळे वसतीगृहात खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.