ओढणीने गळफास घेवून विवाहितेची आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील खंडेराव नगरातील विवाहितेने ओढणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नाजमीनबी फिरोज पिंजारी (वय २२, रा. खंडेराव नगर, जळगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे. नाजमीनबी फिरोज पिंजारी या विवाहिता पती फिरोज, सासू, सासरे आणि दोन दीर यांच्यासह खंडेराव नगर येथे वास्तव्याला आहे. पती फिरोज हा हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. गुरूवार ७ जुलै रोजी सायंकाळी नाजमीनबी पिंजारी ही घरीच होत्या. सासू तायराबी पिंजारी ह्या बाजारात गेल्या आणि पतीसह सासरे आणि दीर हे देखील कामाला गेलेले होते. त्यावेळी नाजमीनबी ही घरी एकटीच होती.

घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत त्यांनी ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सासू तायराबी पिंजारी ह्या घरी आल्या तेव्हा त्यांना सुन नाजमीनबी हिने गळफास घेतल्याचे लक्षात आले.

शेजारचांच्या मदतीने तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.