जळगावात शिक्षकाची राहत्या घरात आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील वाघनगरमधील ४३ वर्षीय शिक्षकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. मयत शिक्षकाचे नाव राजेश बन्सीलाल फुलपगारे आहे. ते विवेकानंद प्रतिष्ठानच्या मूकबधीर विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते.

कौटुंबीक वादातून त्यांची पत्नी गेल्या सहा महिन्यांपासून मालेगाव येथे विभक्त राहत असल्याने ते घरी एकटेच राहत होते. यामुळे राजेश फुलपगारे हे नैराश्येत होते. शाळांना नाताळाच्या सुट्ट्या असल्याने ते घरीच होते. मात्र दोन ते तीन दिवसांपासून ते घराबाहेर न आल्याने शेजाऱ्यांना शंका आली. दरम्यान शेजाऱ्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीत डोकावून पाहिले असता राजेश फुलपगारे हे गळफास घेतल्याचे आढळून आले.

या घटनेची माहिती जळगाव तालुका पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार अनिल फेगडे यांनी घटनास्थळ धाव घेऊन पंचनामा केला. मृत फुलपगारे यांनी साधारण दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून जिल्‍हा रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.