Saturday, January 28, 2023

२१ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

- Advertisement -

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

मनवेल (Manvel) येथील २१ वर्षीय तरुणाने गळफास (suicide) घेऊन आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या संदर्भात पोलीस पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस ठाण्यात (Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जयदीप गुलाब पाटील (वय २१) या तरुणाने दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान आई, वडील व भाऊ ही सर्व मंडळी शेतात कामास गेले असताना आपल्या राहत्या घराच्या छताला असलेल्या लाकडी सऱ्याला दोरीच्या साहायाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटनासमोर आली.

- Advertisement -

या तरुणाने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ट होवू शकले नाही. मयत तरूण हा अविवाहित होता व मोलमजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ आहे. मयत जयदीपच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. दगडी गावाचे पोलीस पाटील विठ्ठल गोरख कोळी यांनी खबर दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे