तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण  अस्पष्ट; अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव (प्रतिनिधी) : घरापासून काही अंतरावर असलेल्या गावातील पोलीस पाटील यांच्या शेतात एका २५ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. १३) दुपारी उघडकीस आली. प्रवीण प्रल्हाद सोनवणे (वय २५, रा. बिलखेडा, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील बिलखेडा येथे वास्तव्यास असलेला प्रवीण सोनवणे हा शेतमजुरीसह वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या घरापासून काही अंतरावर गावातील पोलीस पाटील मुकुंदा पाटील यांचे मका पिकाचे शेत आहे. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलीस पाटील शेतात मका काढण्यासाठी गेले असता, एका झाडाला प्रवीण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती प्रवीणला मृत घोषित केले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून प्रवीणच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्या नुकत्याच घरी परतल्या होत्या. या घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.