जळगावात ४० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

जळगावात ४० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव : शहरातील जुने गावातील परिसरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या शेंगोळा गावातील ४० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार १ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. गजानन येडूबा गावंडे (वय ४०, रा. शेंगोळा ता. जामनेर) असे मृताचे नाव असून शनीपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन गावंडे हे होलेवाडा परिसरात राहून सराफ दुकानावर मजुरीचे काम करत होते. काही दिवसांपासून त्यांची पत्नी माहेरी गेल्याने ते घरात एकटेच राहत होते. दरम्यान, मध्यरात्री त्यांनी घरात गळफास घेतला. ही घटना सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच शनीपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शशीकांत पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.