नाशिकमध्ये शालिमार ट्रेनच्या डब्याला अचानक आग, सर्व प्रवासी सुखरूप

0

 

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क:

कोलकाता येथून येणा-या नाशिकरोड स्थानकावर शालिमार एलटीटी ट्रेनच्या बोगीत आग लागल्याचे वृत्त आहे. (Fire in the carriage of Shalimar LTT train coming from Kolkata at Nashik Road station) बोगी रेल्वेपासून वेगळी करण्यात आली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या बोगीला आग लागली.

सोशल मीडियावर माहिती देताना, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी एम सुतार यांनी लिहिले की, इंजिनच्या शेजारी असलेले सामानाचे डब्बे/पार्सल व्हॅन ट्रेनमधून वेगळे करण्यात आली आहे आणि लवकरच ट्रेन सुरक्षितपणे पुन्हा सुरू होईल. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची वेळ सकाळी 8.45 आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.