परोपकार आणि त्यागाची भावना असणारे सुदर्शनजी गांग

0

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क

परोपकार आणि त्यागाची भावना असणारे क्वचित लोक असतात. सुदर्शनजी गांग यांच्या कार्यातून ही प्रचिती येतेच. त्यांनी केलेले निस्वार्थ कार्य आणि मदतीचे ऋणी संपूर्ण अमरावतीकर आहे. असे हे महान व्यक्तिमत्व. असल्याचे प्रतिपादन डॉ. सिकंदर अडवाणी यांनी अमरावती येथे केले.

भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन गांग आणि सौ. कुंदनताई गांग यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुदर्शनजी गांग यांच्या जीवन चरित्रावर आधारित लोकशाही निर्मित सेवाव्रती हा लघुपट मोठ्या पडद्यावर प्रसारित करण्यात आला. तसेच विदर्भ स्वाभिमानच्या सुदर्शन विशेषांकाचे प्रकाशन, सुदर्शन गांग यांच्या जीवनावर आधारित पुस्तक, आनंद परिवाराचे संचालक अरुण कडू यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन असे संयुक्त कार्यक्रम उत्साहात तापडिया मॉल मधील मिराज थिएटर मध्ये झाला. यावेळी डॉ. अडवाणी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

लोकशाही माध्यम समूहाने ‘कालाय तस्मै नमः’ या उक्तीप्रमाणे नेहमीच पुढचं पाऊल टाकत दैनिकाबरोबर डिजिटल माध्यमात देखील उत्तुंग भरारी घेतली आहे. अठराशेपेक्षा जास्त व्हिडीओ तर चारशेपेक्षा जास्त विविध विषयांवर डॉक्युमेंट्री लोकशाही माध्यम समूहाने निर्मित केल्या आहेत. आता जळगाव जिल्ह्याबाहेर म्हणजेच अमरावती – बडनेरा येथील सुदर्शनजी गांग यांच्यावरील जीवनपट निर्मित केला. हा जीवनपट ५५ मिनिटांचा असून लोकशाही टीमने यासाठी तब्बल ८ महिने मेहनत घेतली. अमरावती, बडनेरा, पुणे, मेळघाट, जळगाव, जयपूर या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले. अमरावती आणि बडनेरा येथील निसर्ग सौंदर्य आणि कृषिप्रधान संस्कृतीचे अप्रतिम मनमोहक दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आले आहे. सुदर्शनजी गांग यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे उत्तम दर्शन या लघुपटात करण्यात आल्याने लोकशाही माध्यम समूहाचे संचालक राजेश यावलकर आणि संचालीका सौ. शुभांगी यावलकर यांचा शाल, मोती माळा आणि चांदीची हनुमान चालीसा देवून लोकशाही समूहाचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सफारीचे गाडगे बाबा म्हणून विदर्भात प्रसिद्ध असलेले डॉ. गोविंद कासट होते. तर माजी खासदार अनंतराव गुढे, प्रतिदिन वृत्तपत्र सर्कल केसरीचे प्रमुख नानक आहुजा, शिवराय कुलकर्णी, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत मुरके, न्यूरो सर्जन सिकंदर अडवाणी, अभिनंदन बँकेचे अध्यक्ष ऍड. विजयबाबू बोथरा, लघुपट निर्माते राजेश यावलकर मंचावर उपस्थित होते.

सर्वप्रथम पाहुण्यांचा मोहनदास ओस्तवाल, प्रदीप जैन, सुगनचंद जैन, कंवारीलाल ओस्तवाल, जवाहर गँग, अभिषेक कडू यांच्या हस्ते स्वागत करण्यात येऊन सन्मान करण्यात आले. यांनतर डॉ. गोविंद कासट, प्राचार्य डॉ. सुभाष गवई, प्रदीप जैन लिखित सृजनशील सेवाव्रती सुदर्शनभाऊ गांग या पुस्तकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. सुदर्शन गांग यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे जीवन, कार्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यावर विदर्भ स्वाभिमानचे संपादक सुभाष दुबे यांनी समर्पित व संपादित केलेल्या सुदर्शन या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

सुदर्शन गांग हे मानवसेवा, धर्मसेवा, पर्यावरण सेवेबरोबरच शहरातील शोषित, दीन, पीडित, उपेक्षितांना मदत व सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असणारे बहुगुणसंपन्न व्यक्ती असल्याचे सांगून सर्वांनी त्यांचे आणि लघुपटाचे कौतुक केले. एलआयसीमध्ये आपल्या कामाचा इतिहास रचणारे प्रशांत छाजेड, पुस्तक प्रकाशनात योगदान देणारे रवींद्र देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य डॉ. सुभाष गवई यांनी केले तर आभार प्रदीप जैन यांनी मानले.

याप्रसंगी डॉ. रवींद्र चोरडिया, नवीन चोरडिया, राजू नन्नवरे, अरुण आठवले, धर्मेंद्र कामदार, राजेंद्र देवडा, जुगलकिशोर गट्टाणी, सरलाबाई सिकची, कांताबाई शर्मा, प्राचार्य बाबासाहब राऊत, जितेंद्र चोरडिया, शाकीरभाई नाईक, जीवन गोरे, शिवाजी देठे, रणजित जाधव, अनिल उगले, अभिनंदन बँकेचे कर्मयोगी, वाघमारे मॅडम, माँ सुगनाबाईजी, अनारबाई ओस्तवाल, डॉ. चंदू सोजतिया, संजय अचलिया, विवेक सहस्त्रबुद्धे, हेमंतकुमार, रोहन, प्रशांत दुधे, सुनीता जांगडा, राजशख्री कोचर, डॉ.नितीन भागवत, सतीश चिंचमलातपुरे, ऋषभ बरडिया, नेमीचंद छाजेड, सौ. चंदा छाजेड, सलील चिंचमलातपुरे, डॉ. रामगोपाल तापडिया, मधु बंग, दादाराव अढाऊ, प्रा. संजय शिरभाते, संजय भोपले, उमेश वैश्य, पंचगाडे, राजेश मुले, शिल्पा कामदार, अविनाश राजगुरे, अर्चना कडू, अनिता जैन, सपना जैन, हिमानी जैन, प्राची जैन, सोनल जैन, हिमानी जैन, प्रियंका जैन, सीमा जैन यांच्यासह शेकडो लोक उपस्थित होते.

दरम्यान बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत मुरके, अभिनंदन बँकेचे अध्यक्ष ऍड. विजयबाबू बोथरा आणि राजेश यावलकर यांचे समयोचीत मनोगत झाले. तर अध्यक्षीय मनोगतात गोविंद कासट यांनी जीवनातील प्रत्येक पैलू महत्वाचा व मानवसेवेसाठी समर्पित असल्याचे सांगून सुदर्शनजी गांग यांना सेवक म्हणून संबोधले.

Leave A Reply

Your email address will not be published.