तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील शिवाजी नगर भागात राहणाऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

समीर रामदास बांदल रा. शिवाजीनगर हुडको जळगाव असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. समीर बांदल हा शिवाजी नगरात वडील, पत्नी, भाऊ व दोन मुलींसह राहतो. गेल्या दीड महिन्यांपुर्वीच समीर हा पुण्याला नोकरी लागली होती. मंगळवारी १८ जानेवारी रोजी समीरच्या घरी गोंधळाचा कार्यक्रम असल्याने तो जळगावात घरी आला होता.

दरम्यान २० जानेवारी रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास समीर घरी एकटा असतांना त्याने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. समीरचे वडील रामदास बांदल हे कामावरून घरी आल्याने हा प्रकार उघडकीला आला आहे. आत्महत्या मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाहीय. समीरची पत्नी माहेरी गेलेल्या होत्या. नातेवाईक विजय लक्ष्मण बांदल यांनी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना ललीत भदाणे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.