त्याचे राजकारणात कोणतेच काम… देसाईंची मुलाच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया;

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शिवसेनेचे सर्वात एकनिष्ठ नेते व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सर्वात जुने निकटवर्तीय सुभाष देसाई (Former minister Subhash Desai)  यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत बाळासाहेब भवनात हा पक्षप्रवेश सोहळा झाला. या प्रवेशावर आता सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे सुभाष देसाई यांनी आपली प्रतिक्रिया जाहीर केली आहे.

सुभाष देसाई म्हणाले कि, माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश करणे माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि मातोश्री सोबत मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील.

त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र, इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे, असे सुभाष देसाई यांनी म्हंटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.