Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    • गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»शैक्षणिक»गिरडगाव येथे विद्यार्थ्यांचे बस रोको आंदोलन
    शैक्षणिक

    गिरडगाव येथे विद्यार्थ्यांचे बस रोको आंदोलन

    बस थांबा सुरू करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 27, 2026Updated:July 27, 2026No Comments305 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    किनगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    गिरडगाव ता. यावल येथील विद्यार्थ्यांसाठी राज्य परिवहन (एसटी) बस थांबत नसल्याने गिरडगाव येथील विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत बस रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे एक तास रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

    गिरडगाव येथून अनेक विद्यार्थी यावल, साकळी, किनगाव, चोपडा तसेच जळगाव येथे उच्च शिक्षणासाठी दररोज प्रवास करतात. मात्र, विद्यार्थ्यांना घेण्यासाठी एसटी बस गावात थांबत नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून बस रोको आंदोलनाचा मार्ग अवलंबला.

    आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. घटनास्थळी संबंधित अधिकारी व प्रशासनाने विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे एसटी बस थांबविण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुमारे एक तासानंतर आंदोलन मागे घेत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

    या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची अपेक्षा विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026

    ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif