Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    • भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»भर दुपारी पत्र्याच्या खोलीत विद्यार्थ्याची घेतली परीक्षा
    शैक्षणिक

    भर दुपारी पत्र्याच्या खोलीत विद्यार्थ्याची घेतली परीक्षा

    शिवसेना उपजिल्हाप्रमुखांनी शिक्षणाधिकाऱ्यांना घेतले धारेवर
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 27, 2026No Comments349 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    मलकापुर तालुक्यात गेल्या 4-5 दिवसांपासून प्रचंड उष्णतेची लाट सुरू असताना मलकापूर येथील चौथीच्या विद्यार्थ्यांची शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा तब्बल 44 अंश तापमानात गोविंद विष्णू महाजन विद्यालयात घेण्यात आली. भर दुपारी लहान विद्यार्थ्यांना टीनपत्र्याच्या खोलीत बसवण्यात आल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

    दरम्यान याबाबतची माहिती पालकांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शहरप्रमुख हरीदास गणबास यांना दिली, अत्यंत उष्ण हवामानात विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व सोयीस्कर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून योग्य नियोजन न झाल्याचे दिसून आले.

    इतर जिल्ह्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी शिक्षणाधिकारी फाळके यांची भ्रमणध्वनीद्वारे कान उघाडणी केल्याने फाळके यांनी तात्काळ परीक्षा केंद्रावर धाव घेतली.

    यावेळी उपस्थित पालकांनी शिक्षणिधिकारी फाळके यांच्या अनागोंदी कारभारा विषयी रोष व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    September 2, 2026

    शाळेत शाळेच्या ड्रेसवर हिजाब घालता येणार नाही!

    August 25, 2026

    मराठी भाषेचा वटवृक्ष ‘यास्मिन शेख’ काळाच्या पडद्याआड

    August 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif