Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»संपादकीय»शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    संपादकीय

    शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 7, 2026No Comments218 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    जळगाव शहरात असलेल्या अयोध्या नगरमधील बी. एन. यू. रायसोनी शाळेत आज एक धक्कादायक प्रकार घडला. दहाव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला दहाव्या वर्गातीलच एका अल्पवयीन विद्यार्थ्याने छातीवर वार करून जखमी केल्याचा प्रकार शाळेच्या परिसरात घडला. आयुष्य गजानन पोपळे असे या जखमी विद्यार्थ्याचे नाव असून, त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची परिस्थिती आता धोक्याच्या बाहेर असून, त्याचे एमआरआय वगैरे काढण्यात येत आहे. त्याला जर तो चॉपर आतड्यांना लागला असता, तर त्याचा जागीच मृत्यू झाला असता, हेही तितकेच खरे आहे.

    जखमी पियुष आणि मारहाण करणारा मुलगा यांच्यात दोन-तीन दिवसांपूर्वी पायात तंगडी घालून त्याला पाडण्याचा प्रकार झाला होता. त्यावेळी पियुषच्या वडिलांनी मुख्याध्यापक व इतर शिक्षकांना भेटून समज देण्याचा प्रयत्न केला होता. पण समज दिली असतानासुद्धा त्या विद्यार्थ्याने शिक्षकांसमोरच, “मी याला पाहून घेईल आणि आणखी मारहाण करेल,” असे म्हटले होते. परंतु, अशा परिस्थितीत तो मारहाण करेल, याची कुणालाही कल्पना नव्हती.

    आज पियुष बी. एन. रायसोनी शाळेत सकाळी सात वाजता खाजगी क्लासला गेला असता, तो श्रीराम मंदिराच्या परिसरात असताना त्यावेळी मागून येऊन त्याने चॉपरने पियुषवर हल्ला केला. हा हल्ला इतका जबरदस्त होता की, तो मरता मरता वाचला. चॉपरने मारल्यानंतर त्याने तोच चॉपर घुमवला, जेणेकरून गंभीर जखम व्हायला पाहिजे. परंतु, नशीब बलवत्तर म्हणून तो थोडक्यात वाचला.

    याबाबत जखमी पियुषच्या वडिलांनी जी हकीकत सांगितली, त्यावरून कोणाचेही डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाही. जखमी पियुषचे वडील हे कुसुंबा येथे राहतात. कुसुंबा येथून सकाळी सात वाजता त्याला क्लासला आणून शाळेत सोडले होते. क्लास हा साडेदहा वाजेपर्यंत असतो. दरम्यानच्या काळात पियुष शाळेतून श्रीराम मंदिर परिसरात जात असताना हा मारहाणीचा प्रकार त्या विद्यार्थ्याने केला.

    याबाबत पियुषच्या वडिलांनी शाळा व्यवस्थापनाला कळकळीची विनंती केली की, शाळेमध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी येतात. त्यांच्या दप्तराची तपासणी शाळा व्यवस्थापनाने केली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटेल. पियुषच्या वडिलांनी पोलीस प्रशासनालाही कळकळीची विनंती केली आहे की, एमआयडीसी परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसविण्यासाठी पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी, जेणेकरून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल. असे म्हणून आपल्या जखमी मुलगा पियुषच्या बाबतीत गुन्हा दाखल करण्याचे काम पूर्ण केले आहे.

    शाळेसमोर अथवा शाळा व्यवस्थापनासमोर या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तो एक चिंतेचा विषय बनला आहे. अल्पवयीन विद्यार्थी जेव्हा चॉपरसारख्या वस्तूचा उपयोग करतात, म्हणजे सराईत गुन्हेगार ज्या पद्धतीने गुन्हेगारी करतात, त्याच पद्धतीने हा अल्पवयीन मुलगा गुन्हेगारी करतोय, ही फार मोठी चिंतेची बाब आहे. अनेक शिक्षणतज्ज्ञांना याविषयी चिंता भेडसावत असणार.

    ज्या वयात शाळेतील विद्यार्थी मैत्रीपूर्ण वातावरणात राहायला हवे, त्या ऐवजी ही गुन्हेगारी प्रवृत्ती आली कुठून? एक तर या विद्यार्थ्यांचे घरचे वातावरण अथवा मित्रमंडळींचे वातावरण हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असले पाहिजे. तेव्हा त्यांनी तंगडी घालून त्या जखमी पियुषला पाडले, त्यावेळची त्यांची भाषा ही सराईत गुन्हेगाराप्रमाणे होती, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

    अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये एवढा खुनशीपणा आला कुठून, याचा शोध घेणे आवश्यक ठरते. मारहाण करणारा तो अल्पवयीन विद्यार्थी सुधारू शकतो का, याचा अभ्यास पहिल्यांदा केला पाहिजे. सर्व तज्ज्ञ मंडळींना हे कोड्यात टाकणारे प्रकरण आहे. सध्या मोबाईलच्या जमान्यात मोबाईलवरून जे व्हिडिओ मुले पाहतात, ते आत्मसात करतात. परंतु, ही बाब करत असताना एवढे धारदार शस्त्र आले कोठून, याचा तपास होणेही आवश्यक आहे. त्याने चॉपरसारखे शस्त्र आणले कोठून, त्याचा शोध घेणे गरजेचे आहे. आजकाल अशी शस्त्रे बाजारात सहज उपलब्ध होतात. ती विकत घेऊन त्याचा असा उपयोग करतात.

    पियुष सुदैवाने वाचला, पण मारहाण करणाऱ्याकडे शस्त्र आले कुठून, याचा तपास पोलिसांना घ्यावा लागेल. त्याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झाला असला, तरी तो अल्पवयीन असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करणे अवघड आहे. त्यामुळे ही केस अत्यंत बारकाईने हाताळण्याची गरज आहे, जेणेकरून शाळेमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!

    September 6, 2026

    अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!

    September 3, 2026

    महामार्ग कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

    September 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif