Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»टीसीच्या वादातून विद्यार्थ्याचा थेट शिक्षकावर हल्ला
    गुन्हे वार्ता

    टीसीच्या वादातून विद्यार्थ्याचा थेट शिक्षकावर हल्ला

    शिक्षक गंभीर : कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 1, 2026No Comments436 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरातील लिटिल फ्लॉवर शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. टीसी म्हणजेच शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने शिक्षकावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय.

    मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगा २०२३ पर्यंत या शाळेत शिकत होता. मात्र तो दहावीच्या परीक्षेत नापास झाला होता. त्यानंतर त्याने शाळा सोडली होती. आज तो टीसी घेण्यासाठी शाळेत आला होता. यावेळी टीसीसंदर्भात त्याचा शिक्षकांसोबत काही कारणावरून वाद झाला. हा वाद काही क्षणांतच वाढला आणि रागाच्या भरात त्याने सोबत आणलेल्या चाकूने शिक्षकांवर हल्ला केला.

    हा संपूर्ण प्रकार शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हल्ल्यानंतर शाळेतील इतर शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत संबंधित मुलाला पकडलं. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

    या प्रकरणाबाबत माहिती देताना छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक जाधव यांनी सांगितलं की, संबंधित विद्यार्थ्याचा शिक्षकांसोबत टीसीवरून वाद झाला होता. प्राथमिक चौकशीत मुलाने २०२३ मध्ये शिक्षकांनी मला जाणूनबुजून नापास केलं असा राग मनात असल्याचं सांगितलं आहे. त्याच रागातून त्याने आता शाळेत येऊन शिक्षकांवर हल्ला केल्याचं समोर आलंय.

    सध्या जखमी शिक्षकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे शाळेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा घटना रोखण्यासाठी अधिक कडक उपाययोजनांची गरज असल्याची चर्चा सुरू झालीये.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif