शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने विद्यार्थीनी गंभीर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
जामनेर – जामनेर शहरातील न्यु इंग्लिश स्कूल मधील ९ वी मध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थीनी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा ही वार्यावर असल्याची प्रचिती पहावयास मिळाली.
सविस्तर व्रुत्तांत व मिळालेल्या माहितीनुसार न्यू इंग्लिश स्कूल मध्ये टिना सतिष तुळस्कर (लोणारी) हि नववी (आय) च्या वर्गात शिक्षण घेत असलेली विद्यार्थीनी . दिनांक १०/१/२०२३ रोजी वर्गातील शेवटचा तास ११:३० च्या सुमारास होता. शिक्षक वर्गात येण्याच्या पुर्वीच उभी असलेली टिना हि शाळेतीलच तिसऱ्या मजल्यावरून अचानक खाली पडली. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड पळापळ सुरू झाली. हि घटना घडल्याने विद्यार्थ्यां मध्ये भितीचे वातावरण पसरलेले होते. टिना तुळस्कर हीला जखमी अवस्थेत पालकांच्या व कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरातील विजयानंद हॉस्पिटल व समर्थ हॉस्पिटल मध्ये एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतू गंभीर जखमी झाल्याने रुबी स्टार मल्टिस्पेशालीटी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून तिच्या कंबरेला तसेच पायाला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी जळगांव येथे हलविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.