Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»रुपाली चाकणकर यांच्या जागी ‘या’ नावाची जोरदार चर्चा
    राजकारण

    रुपाली चाकणकर यांच्या जागी ‘या’ नावाची जोरदार चर्चा

    महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत प्रमुख नेत्यांची बैठक
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 16, 2026No Comments443 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्तीबाबत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक झालीय. ही बैठक मुंबईतील ‘देवगिरी’ या सरकारी निवासस्थानी झाली. या बैठकीत पक्षातील रिक्त पदे भरण्याबाबत आणि काही महत्त्वाच्या पदांवर फेरनियुक्त्या करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

    या बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. आगामी निवडणुका आणि पक्षसंघटन बळकट करण्याच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या रात्री उशिरापर्यंत चाललेल्या खलबतांना पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे प्रामुख्याने उपस्थित होते.

    या बैठकीत महिला प्रदेशाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली जाणार याची चर्चा झाली. भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकरांना महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली नागडवे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

    देवगिरी बंगल्यात झालेल्या बैठकीत पक्षाची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत चर्चा झाली असून न महिला प्रदेशाध्यक्ष आणि युवक अध्यक्षपदासाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला आहे.तर विद्यार्थी अध्यक्ष आणि युवती अध्यक्ष या पदांवर सध्या कार्यरत असलेल्यांनाच पुन्हा संधी देण्यात येणार आहे.

    यानुसार महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे, विद्यार्थी अध्यक्षपदी आकाश झांबरे, युवक अध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. या संघटनात्मक बदलांमुळे पक्षाला नवीन बळ मिळण्याची शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif