संविधान विटंबना निषेधार्थ धर्माबाद कडकडीत बंद

जनआक्रोश मोर्चा काढून निषेध : आंबेडकरी अनुयायी एकत्र

0

 

धर्माबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क 

परभणी शहरांतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतीकात्मक असलेल्या प्रतिची विटंबना एका माथेफिरूने केली आहे. ही घटना लक्षात आल्यावर परभणी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा धर्माबाद शहरांमध्ये तीव्र शब्दात निषेध केला जात आहे.

या घटनेचा निषेध म्हणून दि. 12/12/2024 गुरुवार रोजी धर्माबाद कडकडीत बंद ठेवले असून तालुक्यातील भीम आर्मी, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, सकल बौद्ध समाज, फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ विचाराच्या अनुयायांचा बंद मध्ये सहभाग असून विटंबना झाल्यामुळे धर्माबाद येथील सर्व आंबेडकरी अनुयायाने परभणी येथील घटना जाहीर निषेध करत धर्माबाद शहर बंद ठेवून मोर्चा देखील काढण्यात आला.

मोर्चाचा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक फुलेनगर येथून, बसवन्ना हिल्स, रामनगर चौक, वाल्मिकी चौक, आंध्रा बसस्थानक, नरेंद्र चौक, नेहरू चौक, पोलीस ठाणे, पानसरे चौक, मेन रोड, मोंढा रोड, शिवाजी महाराज चौक, तहसील कार्यालय येथे सांगता करण्यात आली.

झालेल्या ह्या घटनेबद्दल समस्त भीमसैनिक व अनुयायाच्या भावना दुखावले आहेत संविधानाच्या प्रतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकास परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरी त्या समाजकंटकावर कठोरात कठोर कारवाई करून फाशी शिक्षा देण्यात यावी अशी समस्त भिम अनुयायी यांच्यावतीने मागणी करण्यात आली आहे. व त्या समाजकंटकाला असे कृत करण्यासाठी कोणी सांगितले आहे ह्याचा पण तपास करावा ह्यासाठी तालुक्यातील बौद्ध अनुयायी व सर्व धर्मातील संविधान प्रेमी लोकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.