एरंडोल येथे पथनाट्याद्वारे मतदार जनजागृती…

0

 

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार तसेच तहसील कार्यालय एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील समाजकार्य विभागाचे प्रविण देशमुख, रोहन महाजन, योगेश महाजन, वैशाली सुरवाडे, ज्योती कोळी, भूषण बेदारे, जयेश साळुंखे, प्रशिक तायडे या पथनाट्य कलावंत विद्यार्थ्यांनी १४ नोहेंबर २०२२ रोजी नाशिक विभाग शिक्षक पदवीधर मतदार संघात नाव नोंदणी कश्या प्रकारे करावी, त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांआधारे आपण नोंदणी कशी करु शकतो, लोकशाहीमध्ये मतदान ओळखपत्राला आधार ओळखपत्र लिंक करणे किती आवश्यक आहे, हे केल्याने मतदानात कशी पारदर्शकता निर्माण होईल आणि त्यातून योग्य उमेदवार कसा निवडला जाईल याचे महत्व लोकांना पथनाट्याद्वारे पटवून दिले.

शहरातील तहसील कार्यालय, डी.डी.एस.पी.महाविद्यालय, बस स्थानक, शिवाजी महाराज स्मारक व कासोदा, उत्राण आदी ग्रामीण भागात विविध ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. हा कार्यक्रम एरंडोल तहसील कार्यालय, निवडणूक शाखेमार्फत आयोजित करण्यात आला होता. या वेळी तहसीलदार सुचिता चव्हाण, महसूल मंडळातील कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.