Sunday, May 29, 2022

चित्रा वाघ यांच्या सभेवर दगडफेक; म्हणाल्या.. ‘तुमची दहशत गुंड-बलात्काऱ्यांना दाखवा’

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

कोल्हापूर पोटनिवडणुक आता शिगेला पोहचली आहे. आधीच राजकारण पेटलं असताना चित्रा वाघ यांच्या सभेच दगडफेक झाल्याने खळबळ उडाली आहे. यावर त्यांनी सोशल मीडियावर ट्वीट करत आक्रमक टीका केली आहे.

- Advertisement -

उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या सभेत दगडफेक झाली. याबाबत चित्रा वाघ आज सोमवारी फिर्याद देणार असल्याची माहिती आहे. इतकंच नाहीतर या प्रकरणी त्यांनी सोशल मीडियावर ट्वीट करत त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या वतीने राज्यभरातील विविध नेते प्रचारासाठी कोल्हापुरात दाखल होत आहे. काल रविवारी मुक्त सैनिक वसाहत येथे चित्रा वाघ यांची सभा होती सभा सुरू असतानाच शेजारील इमारतीवरून दगडफेक झाली. त्यामुळे सभेत काही काळ गोंधळ निर्माण झाला.

सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्त्यांनी इमारतीकडे धाव घेतली पण तिथे कोणी आढळून आलं नाही. त्यानंतर वाघ यांची सभा सुरळीत झाली आणि त्या दुसऱ्या सभेकडे रवाना झाल्या. दरम्यान, चित्रा वाघ यांनी ट्वीट केलं असून त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की, ‘वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारता….आज सायंकाळी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांच्या प्रचारार्थ मी सभेत बोलत असताना तेथे दगड मारण्यात आले. तुमची दहशत गुंड, बलात्काऱ्यांना दाखवा. असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही. हे लक्षातच ठेवा’ असं त्या म्हटल्या.

दरम्यान, पोलीस अधीक्षकांशी माझं बोलणं झालं असून त्यांनी चौकशी करू केली आहे, अशी माहितीही चित्रा वाघ यांनी दिली आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या