बापरे… अयोध्येसाठी निघालेल्या ट्रेनवर दगडफेक, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गुजरातच्या सुरतेहून अयोध्येला जाणाऱ्या आस्था ट्रेनला काही समाजकंटकांनी लक्ष्य केलं. रविवारी या ट्रेनवर जोरदार दगडफेक झाली. सुरतहुन रात्री ८ वाजेच्या सुमारास ही ट्रेन अयोध्येला निघाली होती. ट्रेन नंदुरबार येथे पोहोचताच रात्री १०.४५ च्या सुमारास अचानक दगडफेक सुरु झाली. त्यामुळे ट्रेनमधील प्रवासी घाबरले. त्यांनी तात्काळ ट्रेनचे दरवाजे, खिडक्या बंद केल्या. पण दगड ट्रेनमध्ये येऊन पडले. दगडफेकीत जखमी कोण आहे? याबद्दल अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाहीये.

घटनेची माहिती मिळताच जीआरपी आणि आरपीएफने सुरुवातीच्या तपासानंतर ट्रेनला रवाना केलं. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येसाठी आस्था स्पेशल ट्रेन रविवारी रात्री ८ वाजता निघाली होती. एकूण १३४० प्रवासी या ट्रेनमध्ये होते. ट्रेनमधील प्रवाशी जेवल्यानंतर भजन करत झोपायच्या तयारीत होते. पावणेअकराच्या सुमारास ट्रेन नंदूरबार येथे पोहोचली. इथे ट्रेन थांबताच अचानक दगडफेक सुरु झाली.

दगड ट्रेनच्या आत आले
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक दगड येत होते. एक नाही तर, अनेकजण दगडफेक करत असल्याचा संशय आहे. अचानक झालेल्या या प्रकाराने प्रवाशी घाबरले. त्यांनी लगेच दरवाजे, खिडक्या बंद केल्या, मात्र तरीही अनेक दगड ट्रेनच्या आत आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.