ऐकावं ते नवलच, कॉपी करू दिली नाही म्हणून शिक्षकांवर दगड फेक…..

0

मनमाड, लोकशाही न्यूज नेटवर्क

प्रत्येक शिक्षकाच एक स्वप्न असत, आपला विध्यार्थी चांगला घडावा आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न देखील सुरु असतात. पण काही मुजोर विद्यार्थीच त्यांच्या जीवावर उठतात. एकीकडे कॉपीमुक्त अभियानाला शासन गती देत असताना दुसरीकडे मात्र कॉपी करू न दिल्याने शिक्षकावरच हल्ला होत असल्याने ही घटना गंभीर मानली जाते. दहावीच्या पेपर दरम्यान कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांनी पेपर सुटल्यानंतर शिक्षकावर दगडफेक केल्याची घटना मनमाडमध्ये घडली आहे. या हल्ल्यात एक शिक्षक जखमी झाले आहे. निलेश दिनकर जाधव असे जखमी शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी शिक्षकाच्या तक्रारीवरुन मनमाड पोलिसात अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विज्ञान 2 पेपरच्या दिवशी घडली घटना

सोमवारी दहावीचा विज्ञान 2 चा पेपर होता. यावेळी शिक्षक निलेश जाधव यांना बोर्डाच्या परीक्षेत सुपरव्हिजनचे काम सोपवण्यात आले होते. मनमाडमधील हक हायस्कूलमध्ये पेपर सुरु असताना काही विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिक्षक जाधव यांनी मुलांना कॉपी करु दिली नाही.

शिक्षक बाहेर येताच विद्यार्थ्यांकडून दगडफेक

पेपर सुटल्यानंतर नीलेश जाधव हे बाहेर पडत असताना काही मुलांनी जाधव यांच्या दिशेने दगडफेक केली. या हल्ल्यात डोक्याला आणि डोळ्याला दगड लागल्यामुळे ते जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेप्रकरणी शिक्षक जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.