वरणगावला माथेफिरूकडून दगडफेक : परिसरात भीती
दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न : पोलिसांसह तरुणांचा रात्रीचा पहारा
वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील बीदाडी मोहल्ला व मोठा माळी वाड्यात गेल्या तीन ते चार दिवसा पासून अज्ञात माथेफिरूकडून रात्रीच्या वेळी घरावर दगडफेकीचा घडत आहे. यातून दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचा संशय निर्माण झाला आहे. असे असले तरी हिंदू व मुस्लिम बांधव एकत्रीत येत यावर पोलीस प्रशासन व परिसरातील तरुणांकडून रात्रीचा पहारा ठेवला जाऊन माथेफिरूला पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे
सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी शहरातील बिदाडी मोहल्ला व मोठा माळीतील नगरिकांकडून नेहमी प्रयत्न असतो. गेली कित्येक वर्षापासून या ठिकाणी राहणारे सर्व समाजबांधव एकत्रित एकमेकांच्या सुखादुःखात, सणसुदीला सहभाग असल्याने जातीय सलोखा कायम ठेवला जातो. मात्र शहरात गेली तीन ते चार दिवसापासून आज्ञात माथेफिरूकडून रात्रीच्या वेळी घरावर दगडफेक करून याला गालबोट कसा लागेल व या दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सुरुवातीला या परिसरातील दोन्ही बाजूचे नागरिक एकामेकडे शंकेच्या नजरेने पाहत होते. मात्र दोन्ही बाजूनी संवाद झाल्यानंतर सरळ पोलीस स्टेशन गाठात तीन चार दिवासाची हकीकत पोलिसांना सांगीतल्या नंतर दोन दिवसापासून पोलीस व काही तरुणांनी रात्रीची गस्त घालत माथेफिरुला शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी या परिसरातील नागरिक गेली तीन चार दिवसा पासुन भितीमय झालेले आहे.
या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालून या माथेफिरूचा छेडा लावण्याची नागरिक अपेक्षा व्यक्त करीत असुन पुर्वी प्रमाणेच या परिसरात जातीय सलोखा व जिवनमान पुर्णपदा वर कसे येईल या साठी प्रयत्न करवे असे नागरिक बोलले जात आहे
पुर्ववैमान्यशातून तर नाही ना दगडफेक ?
याच परिसरात किंवा मोहल्यात राहणाऱ्या एखाद्याचे किरकोळ पुर्वी कुणाशी वाद झाला असेल आणि आता काहीतरी कुरापत काढून त्याला मोठया भांडणाचे स्वरूप देऊन किंवा काही राजकिय वाद घडवून दोन समाजात तेढ होईल असे वातावरण निर्माण करण्याचा तर प्रयत्न तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात असल्याने पोलीस प्रशसानाने याकडे घातले पाहिजे.
रात्रीच होते दगडफेक
या परिसरातील रहिवाशी दिवसभर काहीनाकाही कामा निमित्त बाहेरून रात्री घरी आल्यावर नंतर जेवण झाल्या नंतर ऐन झोपेच्या वेळी कोणीतरी आज्ञात व्यक्तीकडून दगड फेकला जातो. त्यामुळे घरात भितीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिकांची झोपच उडली आहे. घरा बाहेर पहायचे झाले तर एखादा दगड आपल्या आंगावर येण्याची भिती वाटत असते. त्यामुळे या परिसरातील नागरिक भिती पोटी घरातच राहत आहेत.