joseph nogucci coupon code bride to groom wedding gifts traditional 9gag gift ideas world traveller gift ideas nordstrom gift card valentine's day
Friday, December 2, 2022

बांबरुड येथुन उभ्या ट्रकचे टायर चोरी…

- Advertisement -

 

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

तालूक्यातील बांबरूड येथील दुकानासमोर उभ्या असलेल्या ट्रकचे ५० हजार रूपये किंमतीचे चक्क चार चाकं अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाचोरा शहरातील भडगाव रोड भागात राहणारे शशिकांत पाटील याचे बांबरूड येथे सिमेंट प्रोडक्ट पेव्हर ब्लाॅकच्या दुकानाच्या गेटजवळ त्यांचा चुलत भाऊ प्रमोद सोनवणे यांची १०१३ टर्बो ट्रक क्रमांक एम. एच.०४ डी. एस. ०५५१ ही वाहन चालक महेश पटेल याने ३ नोहेंबर रोजी उभी केली होती. शशिकांत पाटील हे संध्याकाळी घरी जातांना गाडी व गाडीचे टायर होते. मात्र रात्री ८ वाजेच्या सुमारास तेथील कर्मचारी कृष्णा वसावा याचा फोन आला की ट्रकचे मागिल चार चाक कुण्या अज्ञात चोरट्यांनी चोरुन घेऊन गेले आहेत.

दरम्यान शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी जाऊन परिसरात तपास केला पण टायर आढळुन आले नाहीत. या घटनेनंतर शशिकांत पाटील यांनी ५० हजार रूपये किंमतीच्या चार टायर चोरीचा पाचोरा पोलिसात भा. द. वी. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंदविला असुन पुढील तपास पोलिस नाईक अशोक हटकर हे करित आहेत.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या