शेअर बाजारात उसळी.. सेन्सेक्समध्ये 58,000 ची तेजी, निफ्टी 17300 च्या वर

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात प्रचंड कमालीची घसरण पहायला मिळाली. तर आज आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टी 1-1 टक्क्यांनी वाढले. बाजार उघडताच सेन्सेक्स 750 अंकांवर चढून 58,000 च्या जवळपास पोहोचला.

आज बाजार सुरू होताच सेन्सेक्स 693 अंकांच्या उसळीवर होता. सुरुवातीच्या मिनिटातच सेन्सेक्स 736 अंकांनी म्हणजेच 1.3 टक्क्यांनी वाढल्यानंतर 57,936.35 वर व्यवहार करीत होता. निफ्टीमध्ये 200 अंकांच्या जबरदस्त वाढीनंतर ट्रेडिंग 17301 वर उघडले. ट्रेडिंग उघडल्यानंतर 8 मिनिटांतच त्याने 17327 चा उच्चांक गाठला होता.

आज निफ्टीमध्ये वाढ पहायला मिळाली आणि फक्त 3 समभाग घसरत आहेत, उर्वरित 47 समभाग हिरव्या चिन्हासह व्यवहार करत आहेत. बँक निफ्टीदेखील 408 अंकांनी किंवा 1.08 टक्क्यांनी वाढला आणि तो 38,097 च्या पातळीवर कायम आहे.

आज विप्रो निफ्टीच्या चढत्या समभागांमध्ये 3.36 टक्क्यांच्या उसळीसह व्यवहार करीत आहे आणि ONGC 3.29 टक्क्यांच्या वर आहे. टेक महिंद्रा 2.86 टक्क्यांनी आणि टायटन 2.72 टक्क्यांनी वर आहे. Divi’s Lab 2.57 टक्के मजबुतीसह व्यापार करीत आहे.

तर इंडसइंड बँक 1.70 टक्क्यांनी आणि एलअँडटी 1.30 टक्क्यांनी खाली आहे. एनटीपीसी 0.64 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.