सामान्यांच्या खिशाला झळ ! SBI च्या व्याजदरात मोठी वाढ

आता ईएमआयमध्येही शिरकावा 

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

भारतातील सर्वांत मोठी शासकीय बँक स्टेट बँक ऑफ इंडियने आपल्या एमसीएलआर दरात वाढ केली आहे. हा एमसीएलआर दर 8.85 टक्क्यांवरून 8.95 टक्के करण्यात आला आहे. हा नवा एमसीएलआर दर 15 ऑगस्ट 2024 पासून लागू झालेला आहे. एमसीएलआर दरात वाढ झाल्यामुळे आता एसबीआय बँकेचे कर्ज महागणार आहे. गृहकर्ज, कार लोन, शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाच्या ईएमआयमध्येही वाढ होणार आहे. एमसीएलआर दर वाढल्यामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.

एनसीएलआर दर वाढल्यामुळे सामान्यांच्या खिशाल कशा प्रकारे झळ बसणार हे समजून घेण्यासाठी तुम्ही एसबीआय बँकेकडू दहा लाख रुपयांचे कर्ज घेतलेले आहे, असे समजू या. या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी दहा वर्षे आहे म्हणजेच 120 महिने आहे असे समजू. तसेच या कर्जासाठी स्प्रेड दर 1 टक्के आहे. एमसीएलआर दर वाढल्यामुळे नेमका काय फरक पडतो हे समजून घेण्यासाठी आपण जुन्या एमसीएलआर आणि नव्या एमसीएलआर दराने किती ईएमआय येतो हे समजून घेऊ या. स्टेट बँक ऑफ इंडियाचा याआधीचा एमसीएलआर दर 8.85 टक्के होता. आता एमसीएलआर दर 8.95 टक्के करण्यात आला आहे.

 

बँकांनीही वाढवला एमसीएलआर रेट 

एसबीआयने एमसीएलआर रेटमध्ये वाढ करण्याअगोदर इतरही बँकांनी आपल्या एमसीएलआर दरात वाढ केलेली आहे. या बँकांचा नवा एमसीएलआर दर देखील या महिन्यापासून लागू झालेला आहे. एमसीएलआर दर वाढवणाऱ्या बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि यूको बँकेचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.