SBI ची ‘ही’ सेवा 7 तासांसाठी बंद; जाणून घ्या अधिक माहिती

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. 26 आणि 27 फेब्रुवारी 2022 रोजी बँकेचे तक्रार सेवा पोर्टल (Complaint Service Portal) काही तासांसाठी उपलब्ध होणार नाही.

SBI आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेळोवेळी आपले पोर्टल अपडेट होत असते. आम्ही आमच्या ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी आमच्यासोबत राहावे कारण आम्ही अधिक चांगला बँकिंग अनुभव देण्याचा प्रयत्न करतो असे एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटरवर हँडलवर म्हटले आहे.

बँकेचे तक्रार पोर्टल https://crcf.sbi.co.in 26 फेब्रुवारीच्या रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध राहणार नाही. या काळात ग्राहक कोणत्याही प्रकारची तक्रार, चौकशी इत्यादींसाठी बँकेच्या टोल फ्री क्रमांक 1800112211/18001234/18002100 वर संपर्क साधू शकतात.

चांगल्या बँकिंग अनुभवासाठी SBI वेळोवेळी मेन्टेनंस करत असते. ऑनलाइन बँकिंग आजकाल सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. कोरोनामुळे लोक डिजिटली बँकेचे अकाउंट हँडल करतात. अशात ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल एसबीआयने दिलगिरी व्यक्त केली आहे आणि ग्राहकांचा बँकिंग अनुभव सुधारण्यासाठी बँक मेन्टेनंस करत असल्याचेही म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.