स्थायी समिती अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांचे स्वप्न!

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी चंद्रशेखर पाटील यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवड झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत बोलताना जे जळगाव शहर विकासाचे स्वप्न त्यांनी सांगितले. ते ऐकल्यानंतर चंद्रशेखर पाटील यांचे विकासाचे विकासाचा दृष्टिकोन साफ असल्याचे चित्र दिसते. जळगाव शहरातील रस्त्यांचा प्रश्न, गटारींचा प्रश्न युद्ध पातळीवरून सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अमृत योजनेद्वारे दोन दिवसाआड ऐवजी एक दिवसाआड देण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भुयारी गटारी योजना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील. जळगाव शहराला स्वच्छ करण्यासाठी साफसफाईचा प्रश्न युद्धपातळीवर होऊन शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न होईल. शहरातील समांतर रस्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल. त्यासाठी जी अतिक्रमेणे अडथळा निर्माण करत आहेत, ती अतिक्रमणे काढून टाकण्याचा आमचा मनोदय आहे. शहराचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने जे ओपन स्पेस आहेत. त्या माध्यमातून उत्पन्न कसे वाढवता येईल, याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सध्या जो गाळ्यांचा प्रश्न पेंडिंग आहे तो गाळ्यांचा प्रश्न सर्व गाळेधारक आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक बोलवून त्यातून काही मार्ग काढण्याचा प्रयत्न राहील. जेणेकरून गाळेधारकांचे भाडे सुरू होईल आणि त्या माध्यमातून उत्पन्न वाढेल. आज गाळेधारकांचा प्रश्न पेंडिंग असल्यामुळे महानगरपालिकेला भाडे मिळत नाही. भाडे मिळत नसल्याने पर्यायाने उत्पन्न बुडते. उत्पन्न बुडाल्यामुळे महानगर पालिकेचे उत्पन्न कमी होते. त्यामुळे गाळेधारक आणि नगरपालिका यांच्यातील समन्वय घडवून उत्पन्न वाढीचा स्त्रोत सुरू करण्याचा प्रयत्न राहील. एकंदरीत स्थायी समिती अध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांची सकारात्मकता पाहता त्यांच्या विकासाचा दृष्टिकोन चांगला आहे हे दिसून येते..!

Leave A Reply

Your email address will not be published.