“औरंगाबाद हमारा था, हमारा है, हमारा रहेगा”

अकबरुद्दीन ओवैसी यांचे संभाजीनगरात वक्तव्य

0

 

छत्रपती संभाजीनगर

एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची संभाजीनगरात जाहीर प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी भाजपा, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलतांना त्यांनी औरंगाबाद हमारा था, हमारा है, हमारा रहेगा असे वक्तव्य केले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की मी दहा वर्षापूर्वी महाराष्ट्रात तुम्हाला शेर बनविण्यासाठी आलो होतो. हा देश जेवढा तिलक लावणाऱ्यांचा आहे तेवढा दाढीवाल्यांचा आहे. दहा वर्षांपूर्वी मी तुम्हाला एकत्र करायचा प्रयत्न केला. तुम्हाला एकत्र करण्यासाठी मी शेरवाणाचा तुकडा पसरुन भीक मागितली होती. तुम्हाला शेर बनायचं असेल तर अत्याचाऱ्यांच्या विरोधात आवाज बुलंद करा. दहा वर्षांनंतर मी तुम्हाला आठवण करुन द्यायला आलो आहे. त्यावेळी कुणीही आमदार खासदार नव्हते, पण आमदार खासदार झाले, मी ते तुमच्या हातात दिले आणि त्यांनी महाराष्ट्रात ही ताकत पुढे नेली आहे. यश मिळाल्यास तुम्हाला खुर्ची देईन, मी तिथे खाली बसेन असेही अकबरुद्दीन ओवैसी यावेळी म्हणाले.

आज दोन एनसीपी आणि दोन सेना आहेत, पहा किती पार्ट्या झाल्या आहेत. शिवसेना आणि भाजप हिंदुत्व सांगणारे पक्ष आहेत, पण शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत. उद्धव ठाकरे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले आहेत. उध्दव ठाकरे जी राहुल आणि प्रियांकाला हिंदुत्व शिकवण्यात यशस्वी झाले का ? किंवा राहुल आणि प्रियांकांना ठाकरेना शिकवण्यात यश आलं का ? अजित पवारांनी शिंदेचा आदर्श घेतला की शिंदेंनी अजित पवारांना आदर्श दिला? की अजित पवारांनी भ्रष्टाचाराचा आदर्श मोदी आणि योगींना दिला? असा सवाल यावेळी अकबरुद्दीन ओवैसी यांनी केला.

जातीचं राजकारण करू नका असं तुम्ही सांगता, मग तुम्ही हे का सांगत नाहीत की धर्माचं राजकारण करू नका. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, आम्ही कायम तुमच्यासोबत राहू. इथे दलित मुस्लिमांवर अत्याचार होत असतात, मराठा- दलित- मुस्लिम एकत्र येऊन अत्याचाऱ्याच्या विरोधात लढूया असे आवाहन यावेळी ओवैसी यांनी केले. मी जरांगे पाटलांना सांगू इच्छितो फक्त मराठा समाज मागास नाहीय तर संपूर्ण मराठवाडाच मागास आहे. मुंबई पुणे नागपूर पेक्षा मराठवाडा मागास आहे. मराठा अरक्षणासोबत मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्न करूया, 30 वर्ष झाले मराठवाडा विकास महामंडळ बनवले, पण ते कागदावर आहे, पैसाच दिलाच नाही, त्यामुळे अरक्षणासोबत मराठवाडा विकास महामंडलाला 50 हजार कोटी रुपयांची मागणी करूयात असेही ते यावेळी म्हणाले.

औरंगाबाद संभाजीनगर नाव बदललं. पण नाव बदलल्यामुळे मराठवाड्यातील प्रश्न सुटणार आहेत का, अरे बेइमानानो काम करा काम. नीती आयोगाच्या अहवालात मराठवाडा सर्वात मागास असल्याचा अहवाल आला आहे. चला मराठ्यांचा साथ सोबत घेऊन मराठवाड्याच्या विकासासाठी लढूयात. मराठा मुख्यमंत्री, मंत्री नको.. पण मराठवाड्यात पाणी आणि नौकऱ्या हव्या आहेत, मराठवाड्याला हक्क हवा आहे. शरद पवार ही हमी देणार का? की निवडणुकीनंतर मोदी सोबत जाणार नाहीत ?अजित पवार शिंदे उध्दव ठाकरे निवडणुकीनंतर कशावरुन पलटी मारणार नाहीत ? असा सवाल अकबरुद्दीन ओवैसी यांनी केला.

आपल्याला भाजप, अजित पवार आणि शिंदे सेना यांना हरवायचं आहे. ज्या जातीकडे जोश आहे आणि होश नाही ती जात यशस्वी होत नाही. वेळ कठीण आहे, मला तुमची साथ हवी आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी कौमला कमजोर करू नका. आमच्या परवानगी शिवाय कुणीही सरकार बनवू शकणार नाही. योगी आनेवाला आहे तेरे बाद अकबर भी आनेवाला है, मोदी भी आनेवाला है तेरे बाद अकबर आयेगा… 20 तारखेला आकाशात फक्त पतंग दिसेल. औरंगाबाद हमारा था हमारा है हमारा रहेगा असेही ओवैसी यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.