ST कर्मचारी आक्रमक, पवारांच्या घराच्या आवारात घुसून चप्पलफेक

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

काल सायंकाळी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आझाद मैदानात जल्लोष करणारे एसटी कर्मचारी अचानक आक्रमक झाले असून कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी घुसून चप्पलफेक आणि दगडफेक केली आहे. तसेच आंदोलक शरद पवार यांच्या विरोधात घोषणा देत आहेत.

यानंतर सुप्रिया सुळे या घराबाहेर येऊन त्यांनी शांततेची विनंती केली, तरी कर्मचारी काही ऐकण्याच्या स्थितीमध्ये नव्हते. एसटी विलीनीकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अडथळा आणला, असा आरोप करत एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी निदर्शने केली.

दरम्यान आंदोलकांनी शरद पवार यांच्या घरावर चप्पल आणि दगडफेक करण्यात येत आहे. हे आंदोलक अधिकच आक्रमक झाले असून त्यांनी सिल्वर ओकला चारही बाजूने घेरले आहे. पोलिसांनी काही आंदोलकांना तब्यत घेतले आहे. तर, पोलीस आणि कर्मचारी यांच्यात वाद होतांना दिसत आहे. या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणात सामील झाल्या असून त्याच या आंदोलनात आघाडीवर आहेत.

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. काल न्यायालयाच्या निर्णयानंतर आझाद मैदानात असलेल्या संपकरी कर्मचाऱ्यांनी आनंद साजरा केला होता. मात्र, त्यानंतर अचानक कर्मचाऱ्यांनी आज हे आंदोलन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.