मोठी बातमी ! दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल उद्या १७ जून २०२२ रोजी दुपारी १ वाजता जाहीर होईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत माहिती दिली कि, “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून २०२२ रोजी दु. १:०० वा. ऑनलाईन जाहीर होईल.”

या परीक्षेस १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे. हा निकाल १७ जून २०२२ रोजी दुपारी 1 वाजता http://www.mahresult.nic.in या वेबसाईटवर जाहीर होणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here