Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»लक्ष द्या.. दहावीच्या निकालाबाबत मोठी बातमी
    शैक्षणिक

    लक्ष द्या.. दहावीच्या निकालाबाबत मोठी बातमी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 12, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    नुकताच बारावीचा निकाल घोषित झाला असून आता दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत सर्व विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता होती. आता त्यांची ही उत्सुकता संपली आहे. दहावी परीक्षाचा निकाल 13 मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.

    पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षाचा निकाल जाहीर होणार आहे. 13 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल मिळणार आहे. निकालापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असून यात सर्व माहिती दिली जाणार आहे.

    गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये, महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 27 मे रोजी जाहीर झाला होता. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षाही लवकर झाल्या. त्यामुळे बारावीचा निकालही लवकर लागला होता. आता दहावीचा निकालही लवकर जाहीर होत आहे. दहावीच्या परीक्षेला सन 2024-25 मध्ये सुमारे 16 लाख विद्यार्थी बसले होते. संपूर्ण राज्यात त्यासाठी 5 हजार 130 मुख्य केंद्र होते.

     

    असा पहा निकाल

     

    http://mahahsscboard.in

     

    http://mahresult.nic.in

     

    http://msbshse.co.in

     

    http://mh-ssc.ac.in

     

    http://sscboardpune.in

     

    या संकेतस्थळांवर तुम्हाला निकाल उपलब्ध होतील. या संकेतस्थळावर जाऊन परीक्षार्थी त्यांचा परीक्षा क्रमांक आणि विचारलेली माहिती भरून निकाल पाहू शकतात.

     

     

    Maharashtra Board Date SSC Result 2025
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif