Saturday, January 28, 2023

ब्रेकिंग: 10वी-12वीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदाची बारावीची लेखी परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा ही 02 मार्च ते 25 मार्च या दरम्यान होईल.

फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीचे लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सप्टेंबर पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

- Advertisement -

सदर वेळापत्रकांबाबत सूचना असल्यास मंडळाकडे लेखी स्वरूपात मागविण्यात आल्या होत्या. दरम्यान संघटना, पालक, शिक्षक यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून इयत्ता 12 वी व इयत्ता 10 वी ची वेळापत्रके अंतिम करण्यात आलेले आहेत.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे