Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»शैक्षणिक»बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    शैक्षणिक

    बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    शानबाग निवासी विद्यालयात शाहिरी पोवाडा, भारुड, गोंधळ, पारंपरिक गण आणि शिवकालीन ‘करपावली’चे विद्यार्थ्यांसमोर प्रभावी सादरीकरण
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 2, 2026No Comments15 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्राच्या समृद्ध पारंपरिक लोककलेची ओळख नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना व्हावी, लोककलांविषयी त्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी आणि लोप पावत चाललेल्या पारंपरिक लोककलांचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेच्या वतीने शानबाग निवासी विद्यालय येथे पारंपरिक लोककला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

    कार्यक्रमाच्या प्रारंभी शानबाग निवासी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांनी बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष व मध्यवर्तीचे प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल तसेच परिषदेचे प्रमुख कार्यवाहक व लोककलेचे अभ्यासक शाहीर विनोद ढगे यांचे स्वागत केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व लोककला प्रशिक्षण शिबिराचे समन्वयक शाहीर विनोद ढगे यांनी केले. महाराष्ट्राची पारंपरिक लोककला ही आपल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जीवनाचा अमूल्य ठेवा आहे. आधुनिकतेच्या प्रवाहात या लोककलांचे संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांची प्रत्यक्ष ओळख करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

    शाहिरी परंपरा, पोवाडा आणि भारुडातून प्रबोधन

    शिबिरामध्ये शाहीर विनोद ढगे यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेची माहिती, शाहिरी कलेचे स्वरूप आणि पोवाड्याची परंपरा याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी प्रभावीपणे शाहिरी पोवाडा आणि भारुडाचे सादरीकरण केले. भारुडाच्या सादरीकरणात बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष सचिन महाजन, सदस्य मोहित पाटील आणि अवधूत दलाल यांनी प्रभावी सहभाग नोंदविला. मनोरंजन, विनोद, उपरोध आणि सामाजिक प्रबोधन यांचा सुंदर संगम असलेल्या भारुडाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.

    शिवकालीन ‘करपावली’ लोककलेची विद्यार्थ्यांना ओळख

    या प्रशिक्षण शिबिरात पारंपरिक गण, शाहिरी पोवाडा, भारुड, गोंधळ तसेच शिवकालीन ‘करपावली’ या लोककला प्रकारांचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. करपावली लोककला प्रकारातील ज्येष्ठ लोककलावंत अरुण जोगी, अशोक जोगी व बबन जोगी यांनी शिवकालीन करपावलीचे प्रभावी सादरीकरण करून विद्यार्थ्यांना या वैशिष्ट्यपूर्ण लोककलेची ओळख करून दिली. तसेच गोंधळ लोककला प्रकारातील कलावंत अवधूत दलाल व गजानन साळुंखे यांनी गोंधळाचे सादरीकरण केले. लोककला प्रकारांचे सादरीकरण करण्यासोबतच त्यांचा इतिहास, परंपरा, सांस्कृतिक महत्त्व आणि सादरीकरणाची वैशिष्ट्ये यांची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक लोककलेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

    जिल्ह्यात १० हजार विद्यार्थ्यांपर्यंत लोककला पोहोचविण्याचा संकल्प

    बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती संस्थेच्या अध्यक्ष नीलम शिर्के-सावंत यांच्या संकल्पनेतून या लोककला प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना पारंपरिक लोककलेचे प्रशिक्षण व माहिती देण्याचा संकल्प परिषदेने केला आहे. या उपक्रमांतर्गत जळगावसह अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ आदी ठिकाणी लोककला प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, या विविध शिबिरांमध्ये सुमारे १० हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

    लोककला संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम

    आजच्या आधुनिक युगात अनेक पारंपरिक लोककला प्रकार लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना लोककलांची प्रत्यक्ष ओळख करून देणे, त्यामागील इतिहास व सांस्कृतिक परंपरा समजावून सांगणे आणि भावी पिढीमध्ये लोककलेविषयी आस्था निर्माण करणे, हा बालरंगभूमी परिषदेच्या या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना लोककला पाहण्यासोबतच ती समजून घेण्याची आणि तिच्या परंपरेशी जोडले जाण्याची संधी मिळाली. कलाकारांच्या प्रभावी सादरीकरणाला विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    शिबिराच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष सचिन महाजन, कार्यकारिणी सदस्य दर्शन गुजराती, मोहित पाटील, अवधूत दलाल तसेच शानबाग निवासी विद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ७०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शानबाग निवासी विद्यालयातील हे लोककला प्रशिक्षण शिबिर लोककला संवर्धनाच्या दिशेने एक प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण उपक्रम ठरले. शिबिराच्या अखेरीस सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif