लोकशाही न्यूज नेटवर्क
रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात ५ पोलिसांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ३ गंभीर जखमी आहेत. हा अपघात ओडिशामधील झारसुगुडामध्ये झाला. भरधाव ट्रेलरने पोलिसांच्या गाडीला जोरात धडक दिल्यामुळे पोलिसांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ३ पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात काशीराम भोई आणि देबदत्त, निरंजन कुजूर, हवालदार लिंगराज धुरुआ आणि होमगार्ड भक्तबंधू मिर्धा यांचा जागीच मृत्यू झाला.
रविवारी पहाटे एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलरने पोलिसांच्या बोलेरो वाहनाला जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला. झारसुगुडा पोलिस ठाण्यासमोरच हा अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांचे वाहन कर्तव्यावर असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेलरशी समोरासमोर धडकले. धडक इतकी जोरदार होती की बोलेरो गाडी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या अपघातानंतर ओडिशा पोलीस दलात आणि स्थानिक परिसरात शोककळा पसरली आहे.
रविवारी पहाटे झालेल्या या भीषण अपघातात ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रूग्णलयात उपचारासाठी दाखल कसण्यात आले आहे. अपघातामध्ये दोन सशस्त्र पोलीस (एपीआर) कर्मचारी आणि एका सार्जंट गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
स्थानिक मीडयाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, जखमींची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. स्थानिक पोलिसांनी अपघातानंतर तात्काळ ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांकडून या अपघाताची नोंद करण्यात आली असून यामागील कारणाचा शोध घेतला जात आहे. भीषण अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळावरील परिस्थितीचा आढावा घेतला. या अपघातामुळे ओडिशामध्ये खळबळ उडाली आहे.

