Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»भरधाव टेम्पोची दुभाजक तोडत २० वाहनांना धडक
    अपघात

    भरधाव टेम्पोची दुभाजक तोडत २० वाहनांना धडक

    पाठलाग करून पकडले आणि दिला चोप
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 1, 2026No Comments347 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पुण्यातील हडपसर परीसरात मोठा अपघात झाला. एका भरधाव आयशर टेम्पो चालकाने अनेक वाहनांना त्यांनी धडक दिल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच हाहाकार माजला. पुणे- सोलापूर मार्गावर भरधाव धावणाऱ्या या टेम्पो चालकाला फातिमानगरातील एका वाहतूक पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. तरी चालक थांबल्याने त्याने तसेच वाहन दामटवल्याने पुढे त्याने अनेक वाहनांना ठोकरले. चालक मद्यधुंद असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी या वाहतूक पोलिसाच्या अंगावरही वाहन धडकवण्याचा चालकाने प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.

    पुण्याच्या हडपसर येथे पुणे–सोलापूर महामार्गावर एमएच 42 एआर 4246 क्रमांकाच्या आयशर टेम्पो चालकाने भरधाव वाहन चालवत मोठा अपघात घडवला. या वाहनाच्या ठोकरल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. पुण्यातील हडपसरकडे जाणाऱ्या फातिमानगर ते मगरपट्टा रस्त्यावर हा धक्कादायक प्रकार घडला. घटनेत अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

    या घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपशहर प्रमुख दत्ताभाऊ खवळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच स्थानिक नागरिकांनी टेम्पोचा पाठलाग सुरू केला. अखेर 15 नंबर चौकात टेम्पो अडवण्यात यश आले. संतप्त नागरिकांनी चालकाला पकडून मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन हडपसर पोलीस ठाण्यात आणले असून पुढील चौकशी सुरू आहे.

    सोमवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर-पुणे लेनवरून पुणे बाजूकडून सोलापूरच्या दिशेने जाणारा एक भरधाव आयशर टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने थेट डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या लेनवर आला. त्यामुळे या टेम्पोच्या आघाताने अनेक वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणात श्रीकांत दत्ता कांबळे (वय-24, रा. मुबारकपूर, ता. निलंगा, जि. लातूर) या चालकाला पकडण्यात आले आहे. या प्रकरणात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif