Wednesday, August 10, 2022

पंढरपुर जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी आषाढी एकादशी निमित्त वारी विशेष गाड्या

- Advertisement -

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

विदर्भ आणि खान्देश मधील वारकऱ्यांसाठी चार गाड्या आणि त्यांचे प्रत्येक दोन फेरे अशा 16 गाड्या वारी विशेष म्हणून चालणार आहेत. या गाड्या नागपुर, नवी अमरावती व खामगांव येथून पंढरपुरसाठी आणि परत अशा चालणार आहेत. त्यांचे वेळा पत्रक आणि डब्यांची संरचना खालील प्रमाणे आहे.

- Advertisement -

- Advertisement -

1) 01115/16 नागपुर मिरज नागपुर विशेष

01115 नागपुर मिरज विशेष दिनांक 6 आणि 9 जुलैला नागपुर हुन सकाळी 8:50 ला सूटेल आणि पुढल्या दिवशी म्हणजे दिनांक 7 आणि 10 जुलैला सकाळी 11:55 ला मिरजेला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 01116 मिरज नागपुर विशेष दिनांक 7 आणि 10 जुलैला दुपारी 12:55 ला मिरजेहुन निघेल आणि दुसऱ्या दिवशी अर्थात दिनांक 8 आणि 11 जुलैला नागपुरला दुपारी 12:25 पोहोचेल. सर्वसाधारण मेल / एक्सप्रेसचे सर्व थांबे या गाड्या घेतील.

डबे संरचना :- 8 द्वितीय श्रेणी स्लीपर, 6 द्वितीय श्रेणी सिटिंग / चेयर कार, 2 वातानुकूलित थ्री टियर आणि 2 एसएलआर एकूण 18 डबे जोडण्यात येणार आहे.

2) 01117/18 नागपुर पंढरपुर नागपुर विशेष 

01117 नागपुर पंढरपुर विशेष दिनांक 7 आणि 10 जुलैला नागपुरहुन सकाळी 8:50 ला सूटेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 8 आणि 11 जुलैला सकाळी 8:00 ला पंढरपुरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 01118 पंढरपुर नागपुर विशेष दिनांक 8 आणि 11 जुलैला संध्याकाळी 17:00 ला पंढरपुरहुन निघेल आणि दुसऱ्या दिवशी अर्थात दिनांक 9 आणि 12 जुलैला नागपुरला दुपारी 12:25 ला पोहोचेल. सर्वसाधारण मेल / एक्सप्रेसचे सर्व थांबे या गाड्या घेतील.

डबे संरचना :- 8 द्वितीय श्रेणी स्लीपर, 6 द्वितीय श्रेणी सिटिंग / चेयर कार, 2 वातानुकूलित थ्री टियर आणि 2 एसएलआर एकूण 18 जोडण्यात येणार आहे.

3) 01119/20 नवी अमरावती पंढरपुर नवी अमरावती विशेष

01119 नवी अमरावती पंढरपुर विशेष दिनांक 6 आणि 9 जुलैला नवी अमरावतीहुन दुपारी 14:40 ला सूटेल आणि पुढल्या दिवशी म्हणजे दिनांक 7 आणि 10 जुलैला सकाळी 9:10 ला पंढरपुरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 01120 पंढरपुर नवी अमरावती विशेष दिनांक 7 आणि 10 जुलैला संध्याकाळी 19:10 ला पंढरपुरहुन निघेल आणि दुसऱ्या दिवशी अर्थात दिनांक 8 आणि 11 जुलैला नवी अमरावतीला दुपारी 12:40 ला पोहोचेल. सर्वसाधारण मेल / एक्सप्रेसचे सर्व थांबे या गाड्या घेतील.

डबे संरचना :- 8 द्वितीय श्रेणी स्लीपर, 4 द्वितीय श्रेणी सिटिंग / चेयर कार, 4 वातानुकूलित थ्री टियर आणि 2 एसएलआर एकूण 18 जोडण्यात येणार आहे.

4) 01121/22 खामगांव पंढरपुर खामगांव विशेष

01121 खामगांव पंढरपुर विशेष दिनांक 7 आणि 10 जुलैला खामगांवहुन सकाळी 11:30 ला सूटेल आणि पुढल्या दिवशी म्हणजे दिनांक 8 आणि 11 जुलैला पहाटे 3:30 ला पंढरपुरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात 01122 पंढरपुर खामगांव विशेष दिनांक 8 आणि 11 जुलैला सकाळी 5:00 ला पंढरपुरहुन निघेल आणि दुसऱ्या दिवशी अर्थात दिनांक 9 व 12 जुलैला खामगांवला संध्याकाळी 19:30 ला पोहोचेल. सर्वसाधारण मेल / एक्सप्रेसचे सर्व थांबे या गाड्या घेतील.

डबे संरचना :- 8 द्वितीय श्रेणी स्लीपर, 6 द्वितीय श्रेणी सिटिंग / चेयर कार, 2 वातानुकूलित थ्री टियर आणि 2 एसएलआर एकूण 18 जोडण्यात येणार आहे.

सर्व विठ्ठल भक्तांनी रेल्वेच्या ह्या वारी विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या