पेडकाई मातेच्या मंदिरात नवरात्रीनिमित्त विशेष पूजा

0

 

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथील आर. के. नगर भागात एका भाविकाने त्याच्या घरासमोर श्री पेडकाई माता व श्री सप्तशृंगी मातेचे छोटेखानी मंदिर बांधले होते. त्याची ते नित्य सेवाही करत होते. मात्र सदरचे भाविक आता अनेक दिवस त्यांच्या नातेवाईकांकडे वास्तव्यास असतात. येथे क्वचितच येतात. त्यामुळे सदरचे मंदिर दुर्लक्षित झाले. ही बाब मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांना कळाली. श्री पेडकाई माता त्यांची कुलदेवी असल्याने त्यांनी तत्काळ सदर मंदिराचा जीर्णोद्धार करत नवरात्रीच्या निमित्ताने मंदिरावर आकर्षक रोषणाई करत पुजा,अर्चा, अभिषेक भक्तिमय वातावरणात पार पडत भाविकांनी नवरात्रीत दर्शनाचा लाभ घेतला.

 

अमळनेर शहरातील व तालुक्यातील ,जिल्ह्यातील ज्यांची कुलदेवता पेडकाई माता आहे अशा सर्व कुलस्वामिनी भाविकांचा एक ग्रुप बनवत पहिल्या माळेपासून ते नवमी पर्यंत श्री पेडकाई माता व श्री सप्तश्रृंगी मातेची विशेष पूजा व आरत्या केल्या. यासाठी डॉ. डिगंबर महाले,आशाताई महाले, विनोदभैया पाटील, सुरेश नारायण पाटील, बिपिन पाटील, रवींद्र बोरसे, पूजा बोरसे,विकास बोरसे, जान्हवी बोरसे, सुरेंद्र बोरसे,दर्शना बोरसे, अर्जुन बोरसे, राधा बोरसे, राजेंद्र महाले, भूपेंद्र महाले, तुषार महाले, खेमराज बोरसे, कैलास बोरसे, ऍड. संदीप बोरसे, गणेश बोरसे,प्रशांत आर.महाले, अमित पाटील,कृपाली पाटील, प्रवीण बोरसे, देसले बाबा, आदीनी आरतीचे यजमान होत नवरात्री उत्सव यशस्वी साठी सहकार्य केले. या विशेष पुजेचे तुषार दीक्षित, प्रसाद भंडारी यांनी पौराहित्य केले.

 

कुलदेवतेचे मूळ मंदिर शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे पासून चार किलोमीटर वरील डोंगराळ जागेवर भव्यदिव्य मंदिर आहे. एवढ्या लांब काहींना जाणे शक्य नसल्याने भाविकांनी अमळनेर येथील मंदिरातच नवरात्रीचे दर्शन घेतले. अनुषंगाने दररोज मंदिराची नित्यसेवा आळीपाळीने करावी असे ठरवत शहरातच सर्वांच्या संमतीने सर्वांना सोयीस्कर होईल अशा मोकळ्या जागी पेडकाई मातेचे मोठे मंदिर बांधून तेथे कायमस्वरूपी सण , उत्सव व व्रतवैकल्य करावेत असे ठरले. लवकरच याबाबत बैठक होणार असून मंदिराचे भव्यदिव्य बांधकाम होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.