सोयगावमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रिया सुरू

0

सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदाच्या भरतीवरील स्थगिती राज्य शासनाने उठविल्याने सोयगाव तालुक्यातील (प्रकल्प सोयगांव ग्रामीण अंतर्गत) एकूण १७ रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदाच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

अंगणवाडी सेविका व मदतनीस या दोन्ही पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोयगाव तालुक्यात अंगणवाडी सेविका ०६ तर मदतनीस ११ पदे रिक्त आहेत.

सोयगाव तालुक्यातील ( ग्रामीण प्रकल्प अंतर्गत) रिक्त असलेल्या धाप, रवळा, सावळदबारा, दस्तापुर, काळदरी, सावंतवाडी , किन्ही, बनोटी, हनुमंतखेडा, गलवाडा-अ ,फर्दापूर येथील प्रत्येकी एक मदतनीस पदासाठी तसेच निंबायती, तिखी, पोहरी बुद्रुक, वनगांव , माळेगांव, नांदा तांडा येथील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका पदासाठी सोयगांव प्रकल्प कार्यालयाने जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज स्विकारण्याची मुदत (दि.५) फेब्रुवारी ते (दि.१८) फेब्रुवारी पर्यंत सुटीचे दिवस वगळून नियोजित केली आहे. तरी सदरील महसुली गावातील पात्र असलेल्या महिला अर्जदारांनी अर्ज करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी सविता सैवर, शेख सय्यद यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.