भाजीपाल्यावर मारले दुर्गंधीयुक्त पाणी

सोयगावच्या आठवडे बाजारातील किळसवाणा प्रकार

0

सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सोयगावच्या आठवडे बाजारात भाजीपालाविक्रेत्यांनी पालेभाज्यावर दुर्गंधी युक्त पाणी मारल्याचा प्रकार दुपारी दोन वाजता उघडकीस आला.  याप्रकरणी काही सजग नागरिकांनी आठवडे बाजारात जाऊन संबंधित भाजीपाला विक्रेत्यांना आठवडे बाजारातून बाहेर काढून समज दिली.

मात्र या दुर्गंधी युक्त पाण्याचा भाजीपालावर वापर केल्याच्या किळसवाण्या प्रकारामुळे नागरीक संतप्त झाले होते. या प्रकारची दखल घेत सुनील गव्हांडे, गजानन चौधरी, मयूर मनगटे आदींसह नागरिकांनी बाजारात जाऊन या प्रकाराची चौकशी केली. संबंधितांना समज देऊन सदर दुर्गंधी युक्त पाण्याचा वापर केलेला भाजीपाला विक्रीसाठी बंदी केली.  मात्र आठवडे बाजारातील या दुर्गंधी युक्त प्रकाराला सोयगाव नगर पंचायतीला जबाबदार धरण्यात आहे आहे.

बाजाराची कमिटी वसुली करणाऱ्या या नगरपंचायतकडून भाजीपाला विक्रेतांनी पाण्याची सोय केली नसल्याचे आरोप सुनील गव्हांडे, गजानन चौधरी, कृष्णा जुनघारे आदींनी केले आहे. दरम्यान या किळसवाण्या प्रकारचा व्हिडीओ समाज माध्यमातून व्हायरल होताच नागरिक या प्रकारामुळे संतप्त झाले होते.

 

साठवण टाकीजवळील वापरले पाणी

शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण टाकीजवळ झालेल्या खड्ड्यामधून दुर्गंधी युक्त पाणी भाजीपाल्यावर वापरण्यात आले होते. दरम्यान या पाण्यात मोकाट डुक्कर, मोकाट जनावरे पाणी पीत असल्याचे शहरातील नागरिकांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.