सोयगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सोयगाव शहरातील कचरा संकलनासह वाहतुकीचे काम करणाऱ्या तीन चालक व ३७ मदतनीस कर्मचाऱ्यांनी वेतन व विविध मागण्यांसाठी आक्रमक होत (दि.१६) जानेवारी पासून कामबंद आंदोलन केले. परंतु नगर पंचायतने या कर्मचाऱ्यांना तातडीने दोन महिन्यांच्या वेतन अदा केले . मात्र संबंधित ठेकेदाराने अद्यापही सफाई कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी नकार दिल्याने त्यामुळे कचरा संकलनासाठी घरोघरी जाणाऱ्या तीन घंटागाड्यांची चाके थांबली. परिणामी शहरात दोन टन कचरा उघड्यावर पडला आहे.
सोयगाव नगर पंचायतीने शहर स्वच्छतेचा कंत्राट दिला आहे. स्वच्छतेवर दरमहा लाखो रुपये खर्च केले जाते. कंत्राटदाराला नगरपंचायतने तीन तीनचाकी घंटागाड्या दिल्या आहे. त्यावर तीन चालक आणि ३७ मदतनीस नियुक्त केले आहे. या कर्मचाऱ्यांना कंत्राटदाराकडून वेतन अदा केले जाते. मात्र या सफाई कर्मचाऱ्यानी गत काही दिवसापासून विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले होते. नगर पंचायतीने या मागण्या मंजूर न करता या कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचे प्रलंबित वेतन दिले परंतु संबंधित ठेकेदाराने अद्यापही या सफाई कर्मचाऱ्यांना कामावर न बोलविल्याने ठेकेदाराच्या आडमूठ्ठे पणामुळे शहरात दुर्गंधी पसरली आहे. गटारी तुडुंब भरल्या असून कचऱ्याचे ढीग साचले आहे. नगरपंचायतने एक वर्षांसाठी घनकचरा व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला आहे; परंतु शासनाने निधीच उपलब्ध करून दिला नाही. तात्पुरता स्वच्छतेचा कंत्राट सुरू आहे. निधीचा प्रश्न वारंवार उभा होत आहे.
सोयगाव शहराच्या स्वच्छतेची नगर पंचायतीने कंत्राटदाराला स्वच्छतेचे काम दिले आहे. परंतु ठेकेदाराने अद्यापही या सफाई कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविले नसून शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे.
सोयगाव नगर पंचायत स्वच्छतेत नावलौकीक होती. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात सोयगाव नगर पंचायतीने सहभाग नोंदवला होता. परंतु आता सोयगाव शहर कचरामय झाले आहे. सोयगाव शहरात दररोज एक क्विंटल कचरा जमा होतो. त्याचे संकलन करून कचरा डेपोवर वाहतूक करण्यासाठी कंत्राट काढलेला आहे. ही प्रक्रिया नियमित चालणे आवश्यक आहे; परंतु वारंवार देयकावरून कचरा संकलन थांबत आहे.
घंटागाडीची कामबंदमुळे थांबली चाके
आजमितीस हेच सोयगाव शहर बकाल झाले आहे. विशेष म्हणजे घनकचरा व्यवस्थापनासाठी दरमहा लाखो रुपये खर्चुनही ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पहायला मिळतात. ठेकेदाराने सफाई कर्मचाऱ्यांना अद्यापही कामावर बोलावले नाही त्यामुळे शहरात कचरा साचला आहे..