राज्यातील सोयाबीनचे भाव वाढले

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश आले अली आहे. यंदा देखील  सोयाबीनचे दर वाढवणार हा मुद्दा होताच.  दरम्यान निवडणूक संपताच चार हजाराच्या आत असलेले सोयाबीनचे दर शुक्रवारी अचानक पाच हजाराच्या वर गेले असल्याने  शेतकऱ्यांना खुशखबर मिळाली आहे.

राज्यात या वर्षी सोयाबीनचा विक्रमी पेरा झाला होता. एकूण खरीप क्षेत्राच्या ३४ टक्के क्षेत्रात सोयाबीनचा पेरा झाला होता. उत्पादनही विक्रमी येणार असाच अंदाज होता. सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ४८९२ रुपये इतके किमान आधारभूत मूल्य जाहीर केले असले तरी सुरुवातीच्या काळात हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात होती.

ऐन निवडणुकीत सोयाबीनचे भाव चार हजाराच्या आतच होते. यासाठी राज्य सरकारने राज्यात हमीभावाने खरेदी केंद्रे उघडली परंतु निवडणूक काळात ती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊ शकली नाहीत. त्यामुळे दरावर चर्चा होण्याची गरज होती. विविध बाजार समित्यांमध्येही व्यापाऱ्यांकडून वाढीव दराने सोयाबीन खरेदी सुरु केली आहे. विशेषत: पिवळ्या सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीत सोयाबीनच्या दरावरून विरोधकांनी प्रचारात राळ उठविली होती. त्याचा फटका महायुतीला बसला होता. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सोयाबीनला हमीभाव ४८९२ इतका जाहीर करत हमीभाव केंद्रे सुरू केली. दर वाढल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.