विमानतळावर साउथ स्टार थलापती विजयचा अपघात

गाडीत चढतांना घसरला अन... : चाहत्यांमध्ये चिंता

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आणि तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके)चे प्रमुख थलापती विजय रविवारी चेन्नई विमानतळावर अपघातात झाल्याने चर्चेत आहेत. परदेश दौऱ्यावरून परतत असताना, विमानतळ अचानक गर्दी आल्याने विजय अचानक घसरला आणि पडला. ही घटना काही क्षणच घडली, परंतु त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये आणि त्याच्या चाहत्यांमध्ये भिती निर्माण झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय रविवारी रात्री मलेशियाहून चेन्नईला परतला होता. तो त्याच्या आगामी “जननायकन” चित्रपटाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता. विमानतळावर पोहोचताच, त्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने समर्थक आणि चाहते जमले होते. विजय टर्मिनलमधून बाहेर पडून त्याच्या गाडीकडे चालत असताना, गर्दीचा ताण अचानक वाढला आणि त्याला तोल गेला.

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विजय लगेचच पकडले त्याला ताबडतोब उचलण्यात आले आणि सुरक्षितपणे गाडीत बसवण्यात आले. सुदैवाने, या घटनेत त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. पण, विजय पडला म्हणून काही क्षणांसाठी वातावरण तणावपूर्ण झाले.

या घटनेचे व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झपाट्याने व्हायरल झाले. व्हिडिओमध्ये विजय गर्दीत त्याच्या गाडीकडे येत असताना अचानक घसरताना दिसत आहे. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला ताबडतोब घेरले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर विजयच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली.

विजय आजकाल केवळ त्याच्या अभिनयासाठीच नव्हे तर राजकारणात सक्रिय सहभागी आहे. “जननायकन” हा त्याचा शेवटचा चित्रपट म्हणून ओळखला जात आहे, त्यानंतर तो पूर्णपणे राजकारणावर लक्ष केंद्रित करू शकतो. विमानतळावरील या घटनेमुळे त्याच्या चाहत्यांना चिंता वाटत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.