‘सूर्यवंशम’ फेम सौंदर्याच्या मृत्यूप्रकरणी नवा खुलासा

22 वर्षांनंतर कारण समोर

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

‘सूर्यवंशम’ सिनेमा हा सर्वांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या पत्नी राधा या भूमिकेला अभिनेत्री सौंदर्या हिने साकारली होती.या सिनेमाला आणि अमिताभ बच्चन – सौंदर्या यांच्या जोडीने चाहत्यांना डोक्यावर देखील घेतलं. पण अभिनेत्री निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. सौंदर्या हिचं निधन प्लेन क्रॅशमध्ये झालं. तेव्हा अभिनेत्री प्रेग्नेंट देखील होती. आता अभिनेत्रीच्या निधनाच्या 22 वर्षांनंतर मृत्यूप्रकरणी नवा ट्विस्ट समोर येत आहे.

सौंदर्याच्या निधनाच्या 22 वर्षानंतर टॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मोहन बाबू यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मोहन बाबू यांच्यावर सौंदर्याच्या मृत्यूमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.

17 एप्रिल 2004 मध्ये प्रायव्हेट प्लेन क्रॅशमध्ये सौंदर्याचे निधन झालं. रिपोर्टनुसार, त्यावेळी अभिनेत्री करीमनगरला भाजप आणि तेलुगु देसम पार्टीच्या एका राजकीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होती, ज्यामध्ये तिच्या भावाचाही मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सौंदर्याचा मृतदेहही सापडला नाही. आता अभिनेत्रीच्या मृत्यूच्या 22 वर्षांनंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीत धक्कादायक दावा देखील करण्यात आला आहे. अभिनेत्रीचा अपघात नाही तर हत्या झाली आहे.. असं सांगण्यात येत आहे. मोहन बाबू आणि सौंदर्या यांच्यात संपत्तीवरुन वाद असल्याची माहिती समोर येत आहे. फिर्यादीने मोहन बाबूवर विमान अपघातानंतर भाऊ आणि बहिणीवर जमीन विकण्यासाठी दबाव आणल्याचा आणि बेकायदेशीरपणे संपत्तीवर ताबा मिळवल्याचा आरोप केला आहे. चिट्टीमल्लू असे तक्रारकर्त्याचे नाव असल्याचं सांगण्यात येत आहे.

तक्रारीत त्यांनी मंचू कुटुंबात सुरू असलेल्या वादाचाही उल्लेख केला आहे, ज्यामध्ये मंचू मनोजला न्याय मिळावा आणि जलपल्ली येथील 6 एकरचे अतिथीगृह जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. एवढंच नाही तर मोहन बाबूमुळे आपल्या जीवाला धोका असल्याचं फिर्यादीत म्हटले असून पोलिस संरक्षणाची देखील मागणी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.