धक्कादायक.. सोनू निगमवर FIR दाखल

पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन, काय आहे प्रकरण ?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक सोनू निगम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बेंगळुरू येथे झालेल्या एका कॉन्सर्टनंतर सोनू निगम विरोधात FIR देखील दाखल करण्यात आला आहे. कॉन्सर्टमध्ये सोनूने केलेल्या वक्तव्यामुळे कन्नड समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आहे. सोनू निगम याने कन्नड चाहते आणि पहलगाम येथील हल्ल्याबद्दल वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे सोनू निगम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?

बेंगळुरू येथे झालेल्या एका कॉन्सर्टमध्ये सोनू निगम गाणी गात होता. तेव्हा एक चाहत सतत गायकावर कन्नडमध्ये गाणं गाण्यासाठी दबाव टाकत होता. अशात सोनूने चाहत्यांची इच्छा पूर्ण केली नाही कारण चाहते त्याला धमकी देत होता. यानंतर सोनू निगम याने जे वक्तव्य केलं. ज्यामुळे आता वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. कॉन्सर्ट दरम्यान सोनू म्हणाला, ‘हेच कारण आहे, ज्यामुळे पहलगाम याठिकाणी युद्ध झालं आहे..’ सोनू निगमच्या या वक्तव्यानंतर कन्नड समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. गायकाने एका साध्या कन्नड गाण्याच्या मागणीचा संबंध पहलगाममधील दहशतवादी घटनेशी जोडला, ज्याला लोकांनी असंवेदनशील आणि अनावश्यक म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.