gift wrapping like shirt door gift rm2.00 shoprite gift card discount mltd coupon november 2015 v force weight vest coupon code
Thursday, December 1, 2022

उभ्या ट्रॅक्टरवर आदळली कार; तीन ठार; चिमुकली जखमी

- Advertisement -

सोनगीर, लोकशाही न्यूज नेटवर्क  

- Advertisement -

भरधाव वेगाने शिरपूरहून धुळ्याकडे येणारी चारचाकी सोनगीरजवळील (Songir) रस्ता दुरूस्तीच्या कामासाठी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता कि यात तीन जण जागीच ठार झाले. तर १० वर्षांच्या चिमुकलीसह तिघे जखमी झाले. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर गव्हाणे फाट्याजवळ झाला.

- Advertisement -

या अपघातात पांडुरंग धोडू महाजन (वय ५८, रा. बजरंग चौक सोनगीर), संदीप शिवाजी चव्हाण (वय ४३, रा. सिडको कॉलनी नाशिक) व हितेश चौधरी (वय, ४० म्हससरुळ, जि.नाशिक) अशी मृतांची नावे आहेत.

- Advertisement -

नरडाणा गावापासून चार किलोमीटर अंतरावरील गव्हाणे फाट्यानजीक सद्भाव कंपनीचे कर्मचारी रस्ता दुरुस्तीचे काम करत होते. त्यांचे साहित्य असलेले ट्रॅक्टर महामार्गावर उभे होते. यावेळी शिरपूरकडून धुळ्याकडे जाणारी कार (क्र.एम.एच. ०२,डी.एस. १२७७) ही भरधाव ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर आदळली. कारचा वेग एवढा हाेता की ती ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खाली जाऊन अडकली.

या अपघातात रस्ता दुरुस्तीचे काम करणारे पांडुरंग महाजन हे जागीच ठार झाले. कारमधील संदीप चव्हाण, हितेश चौधरी हे कारच्या पुढील भागात अडकल्याने जागीच ठार झाले तर कारमधील साक्षी संदीप चव्हाण (वय १०) व इतर तिघी जण गंभीर जखमी झाले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या