यावल शहर

यावल शहरातील विरार नगर येथील रहिवासी गृहिणी तथा श्रद्धा ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ. सोनाली विवेकानंद तायडे यांना चाळीसगाव येथे दि. २१ जुलै २०२६ रोजी आयोजित राज्यस्तरीय अवॉर्ड शोमध्ये महाराष्ट्र बिझनेस अँड ब्युटी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन दक्षित डॉल्फिन डिझायनर कंपनीच्या वतीने करण्यात आले होते. राज्यभरातून अनेक ब्युटी एक्स्पर्ट्सनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता. आपल्या क्षेत्रात उच्च व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ब्युटी पार्लर संचालिकांना यावेळी अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.
यावेळी डॉल्फिन डिझायनर कंपनीचे सीईओ नितीश शिवहरे, एमडी प्रियंका साहू आणि रश्मी लोढाया यांची विशेष उपस्थिती होती. आपल्याला मिळालेल्या या अवॉर्डबाबत सौ. सोनाली विवेकानंद तायडे यांनी सांगितले की, “या पुरस्कारामुळे माझ्या कार्यात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली असून, यामुळे मला पुढील कार्यासाठी आणखी प्रेरणा मिळेल.”
सौ. सोनाली तायडे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार तसेच हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत असून, त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.


