Tuesday, November 29, 2022

बाबरने विराटसाठी केले असे काही…!

- Advertisement -

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

- Advertisement -

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा मैदानात आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो, तर मैदानाबाहेर तो इतर संघांच्या खेळाडूंसोबत अगदी वेगळा असतो. याचाच प्रत्यय काल सर्वांना आला. सध्या भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. एकदिवसीय मालिकेत १-१ ने बरोबरी झाली असून आता अंतिम सामन्यात जो संघ विजयी होईल, त्या संघाला मालिका आपल्या खिशात घालण्याची संधी आहे.

- Advertisement -

- Advertisement -

तत्पूर्वी काल इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्या दरम्यान क्रिकेट विश्वाला भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनोखा मैत्रीपूर्ण प्रसंग पाहण्यास मिळाला. ज्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते देखील पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याचे कौतुक करतांना दिसून येत आहेत. बाबरने काल विराट काल अवघ्या १६ धावांवर बाद होताच “हेही दिवस निघून जातील, तू खंबीर राहा” या आशयाचे tweet करत विराट सोबतचा फोटोही त्याने शेयर करत विराटला धीर दिला.

गेल्या अनेक महिन्यांपासून विराट हा सुमार कामगिरी करत आहे. त्यात त्याला लहान संघांविरोधातील मालिकेत विश्रांती देण्यात येत असून त्याच्यावर अनेक माजी जेष्ठ खेळाडूंनी सडकून टीकाही केली. पण वेस्ट इंडीज दौऱ्यातून त्याला संघातून वगळून निवड समितीने देखील त्याला आपली वयक्तिक कामगिरी सुधारण्याचेच संकेत दिल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात त्याच्यावर आणखीनच मानसिक दबाव येण्याची शक्यता आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या